“शरद पवारांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष विरोधी बाकावर गेली”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामुळे बंड केल्याचा आरोप अनेक आमदारांनी केला. या सत्तानाट्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे.

यावरून आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी या पोस्टमध्ये 1995 सालची एक आठवण सांगितली आहे. तर अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी मी हे लिहीत असल्याचं आव्हाड म्हणाले.

1995 साली युती सरकार विजयी झालं आणि महाराष्ट्रात बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं. तेव्हा शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते व वर्षा बंगल्यावर राहायला होते, त्यावेळची आठवण आव्हाडांनी सांगितली आहे.

निकाल लागल्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी या पूर्णवेळेत मी शरद पवारांसोबत उपस्थित होतो. त्यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ज्यांची नावं मी इथे लिहायला इच्छूक नाही त्यांनी शरद पवारांना सरकार बनवण्याचा आग्रह केला, असं आव्हाडांनी सांगितलं.

मात्र, जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकांवर बसायला हवं, असं शरद पवार म्हणाले होते. हे वाक्य शरद पवारांचं होतं. दिल्ली किंवा काँग्रेस हायकमांडचा यात काहीही संबंध नव्हता, असं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलं.

पवार साहेबांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष ही विरोधी बाकांवर बसण्यात गेली आहेत. 1967ला पहिल्यांदा निवडून आल्यापासून ते विधीमंडळाचे नाही तर संसदेचे सदस्य आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य

“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”

‘चार गाढवं एकत्र चरत असली तरी हुकुमशहाला भिती वाटते’, शिवसेनेचा हल्लाबोल

बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार, शिवसेना नेत्याने मानले भाजपचे आभार

‘संजय राऊतांनी गजनी बघावा’, भाजप नेत्याचा हल्लाबोल