….अन् किशोरी पेडणेकरांंनी ते प्रेमपत्रच खाल्लं, पेडणेकरांच्या प्रेमकहाणीतील भन्नाट किस्सा

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगली. शिवसेना व शिंदे गट असे दोन भाग पडले असून या गटात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

सध्या सगळीकडे महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा असताना आता मनोरंजनाच्या मंचावर देखील राजकीय वारे वाहणार आहेत. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर व शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील एकाच मंचावर येणार आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडत नाही. हवा येऊ द्याच्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात बंडखोरीमुळे वेगळे झालेले दोन राजकीय नेते एकत्र दिसणार आहेत.

राजकीय फटकेबाजीसोबतच य नेत्यांच्या खासगी आयुष्यातील गुपित देखील आता उलगडणार आहे. या भागाच्या प्रोमोत किशोरी पेडणेकरांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा एक किस्सा सांगितला आहे.

त्यांनी मला एकदा प्रेमपत्र दिलं आणि नेमकं ते माझ्या हातातून खाली पडलं. नेमकं तेव्हा घरात खूप लोकं होते आणि माझ्या एका भावाने ती चिठ्ठी पाहिली, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

भावाच्या धाकाने मी पटकन ती चिठ्ठी खाल्ली, असा रंजक किस्सा किशोरी पेडणेकर यांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर सांगितला. तर या मंचावर किशोरी पेडणेकर यांचे पती त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तिच चिठ्ठी लिहिणार आहेत.

दरम्यान, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनीही सपत्निक या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या खासगी जीवनातील रंजक किस्से आता समोर येणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष विरोधी बाकावर गेली”

‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य

“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”

‘चार गाढवं एकत्र चरत असली तरी हुकुमशहाला भिती वाटते’, शिवसेनेचा हल्लाबोल

बंडानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार, शिवसेना नेत्याने मानले भाजपचे आभार