किव | रशिया-युक्रेनमधील युद्ध 48व्या दिवशी देखील सुरू आहे.(Russia-Ukraine War) दोन्ही देशांपैकी एकही देश माघार घ्यायला तयार नाही आहे. यूक्रेनच्या मारियुपोल मध्ये रशियाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. शहरात आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू असतानाच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अचानक पणे युक्रेनला भेट दिली. जॉन्सन हे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्यासोबत किवच्या रस्त्यांवरून फिरताना दिसले.
दोन मिनिटांहून अधिकच्या या व्हिडीओत हे दोन्ही नेते स्नायपर्स आणि इतर सुरक्षा व्यवस्थेत फिरताना दिसत आहेत. कीवच्या मुख्य क्रेशचॅटिक रस्त्यावरून मैदान स्क्वेअरकडे जाताना हे दोन्ही नेते रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन करतानाही दिसत आहेत.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले. त्यानंतर जी-7 नेत्याची युक्रेनला दिलेली ही पहिलीच भेट आहे.
पंतप्रधान जॉन्सन यांनी 120 सुसज्ज वाहने आणि नवी अँटी-शिप मिसाईल सिस्टिम देण्याचेही आश्वासन दिलं आहे. याशिवाय, त्यांनी जागतिक बँकेच्या अतिरिक्त 500 दसलक्ष डॉलर एवढ्या कर्जाचीही पुष्टी केली आहे.
because they bloody can pic.twitter.com/FaTUt0lvP6
— Ukraine / Україна (@Ukraine) April 9, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज
“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”
अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार