कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती काढणार थेट विधानभवनावर मोर्चा!

मुंबई | कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती न्याय आणि हक्कांसाठी येत्या 13 डिसेंबरला विधानभवनावर धडक मोर्चा काढणार आहे. त्यामुळे कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

9 डिसेंबरला बेगगावपासून बाईक रॅली काढत या मोर्चाला सुरूवात होईल. 10 डिसेंबरला कोल्हापूर, 11 डिसेंबरला सातारा, 12 डिसेंबरला पुणे असा प्रवास करत हा मोर्चा 13 तारखेला विधानभवनावर पोहोचेल. पुर्वी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या गेल्या नाहीत. पण आता  ठाकरे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा या समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात कडकनाथ कोंबडीपालन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्यांना सुरूवातीला 75 हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागत होती. पैसे गुंतवा, कोंबड्या पाळा, अंडी आणि कोंबड्या विका, असं या योजनेचं स्परूप होतं मात्र यामध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलं. त्याचेच पडसाद आता उमटणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येणार असल्याचं दिसतंय. येत्या13 डिसेंबरला कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती विधानभवनावर धडक मोर्चा काढणार आहे.

महत्वाच्या बातम्या-