मुंबई | सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन पहायला मिळतं. अशातच एकता कपूरने बॉलिवूडच्या क्वीनसोबत एक नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
या शोचं नाव लॉक अप बेडएस जेल अत्याचारी खेल असं आहे. शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला कंगना बोलते की या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहे. ट्रेलर शेअर करतानी कंगना म्हणाली, माझे नियम आणि माझं लॉकअप. तर सोशल मीडियावर या ट्रेलरची चर्चा देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून रिअॅलिटीशोचा ट्रेलर शेअर केला आहे. हा शो 27 फ्रेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ALTBalaji आणि MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो 24- 7 लाइव्ह स्ट्रीम होणार आहे.
सेलिब्रिटींचे कपडे उतरतील ते सुद्धा सगळ्यांसमोर यामुळे शोमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होणार आहे. शोमध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटी असणार आहेत. तसेच सेलिब्रिटींना बरेच महिने लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहे.
सेलिब्रिटींना सोईसुविधा देखील पुरवल्या जाणार आहे. सेलिब्रिटींना अशा व्यक्तीसोबत लॉकअपमध्ये ठेवण्यात येईल ज्यांच्यासोबत ते एक मिनिटही राहू शकत नाहीत.
दरम्यान, एविक्शनपासून वाचण्यासाठी सेलिब्रिटींना डार्क सीक्रेट्स जगासमोर सांगण्याशिवाय त्यांना पर्याय नसणार आहे. याचाच अर्थ शोमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“चंद्रकांतदादा बेगाने शादी में नाचू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील”
“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे”
पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार
भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’