‘लवकरच बस हवेत…’; नितीन गडकरींची मोठी घोषणा

मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी महत्वाच्या घोषणा केोल्या आहेत.

माझ्याकडे आता रोपवे, केबल कार आली आहे. आता मी केशवजींना सांगितलं आहे की, हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू, असं नितीन गडकरी म्हणाले.

तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो, असं नितीन गडकरी यावेळी म्हणालेत.

नितीन गडकरी यांनी यावेळी यासंबंधीच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना माहिती देण्यात आल्याचं सांगितलं आहे.

नितीन गडकरींनी यावेळी हायड्रोजन इंधनाचा वापर वाहनांमध्ये केला जाईल असं सांगितलं. राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता, त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन 100 रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत 68 वर येईल, असा दावा नितीन गडकरींनी केला आहे.

नितीन गडकरी यांनी यावेळी विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या सरकारमुळे गुंडाराज संपला असून कायदा-सुव्यवस्था आली असल्याचंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“चंद्रकांतदादा बेगाने शादी में नाचू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील” 

“भाजपला दूध दिसत नाही शेण दिसतं, त्यांचा दृष्टिकोनच तसा आहे” 

पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’ 

“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी”