Top news महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूड क्वीन कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनानं मुंबईची तुलना पाकिस्तान सोबत केली होती. कंगनानं मुंबईची तुलना पाकबरोबर केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनावर तोफ डागलली होती. यानंतर कंगना रानौत आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे.

कंगना 5 दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आली होती. कंगनाला मुंबईत धोका असल्याचं सांगत कंगनाला मुंबईत केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर सोमवारी सकाळी कंगना मनालीला परत गेली आहे. मनालीत परत जाताच कंगनानं पुन्हा पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्वीटरवरून निशाणा साधला आहे.

मनालीमध्ये पोहचताच कंगनानं वा.दग्रस्त विधान करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन केलं आहे. तसेच सुशांतचे मा.रेकरी, मुव्ही मा.फिया आणि ड्र.ग्ज त.स्कर ही सर्व मंडळी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंबरोबर असतात, असं म्हणत तिनं आदित्य ठाकरेंवरही घणाघात केला आहे.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मूळ समस्या अशी आहे की, मी मुव्ही मा.फिया, सुशांत सिंह राजपूतचे मा.रेकरी आणि अं.मली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही सर्व मंडळी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. मी यांचा पर्दाफाश केल्यामुळे हे माझा बंदोबस्त करत आहेत. पण ठिकय आता पाहूयात कोण कोणाचा बंदोबस्त करतं ते,’ असं कंगनानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कंगना आणी शिवसेनेमध्ये चाललेल्या वा.दात प्रथमच कंगनानं उद्धव ठाकरे यांना खूलं आवाहन केलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंवरही अनेक गंभीर आरोप कंगनानं केले आहेत. कंगनाच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भूकंप येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कंगना आणि शिवसेने दरम्यान चाललेल्या वा.दाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बोधगया येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाशी ल.ढण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोरोनाशी ल.ढाई करावी, असा सल्ला फडणवीस यांनी यावेळी ठाकरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात; मग मराठा आरक्षण का दिलं नाही?”

बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…

‘माझे हजारो स्त्रियांशी शारिरीक संबंध असतील पण…’; सलमाननं त्यावेळी केले होते अनेक खुलासे, वाचा सविस्तर

रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ

सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती