Koo अ‍ॅपवर कंगनाची धमाकेदार एन्ट्री, पहिल्याच पोस्टमध्ये ट्विटरवर निशाणा म्हणाली…..

अभिनेत्री कंगना राणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळं कंगना चर्चेचा विषय बनत असते. तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे कंगनाला अनेक वेळा ट्विटरचा फटका बसला आहे. यामुळे कंगना भरपूर वेळेस ट्रोल झाली आहे. यातच आता कंगना राणौत एका नवीन गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

आता कंगनाची ट्विटरवरील ही टिवटिव थांबणार आहे. कंगना ट्विटरला रामराम ठोकत आता koo अॅपवर आली आहे. ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनानं आता अखेर koo या इंडियन मायक्रो ब्लाॅगिंग अॅपवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. यातच कंगनानं koo अॅपवर पदार्पण करताच ट्विटरला जोरदार टोला लगावला आहे.

koo अॅपवर येताच कंगनानं आपल्या बायोमध्ये स्वतःला खरी देशभक्त आणि गरम रक्ताची क्षत्रिय स्त्री म्हटलं आहे. koo अॅपवरची पहिली वहिली पोस्ट शेअर करत कंगना म्हटली की, ‘सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड साठी लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते…,’

कंगना कू वर येताच तिच्या फाॅलोवर्समध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. कू अॅपवर कंगनाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा फॉलो करत आहेत. ट्विटवर शेवटचं ट्विट करताना कंगनानं म्हटलं की, “ट्विटर आता तुझा टाईम संपला आहे. आता Koo App अॅपवर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकर कू अॅपवर शिफ्ट होत असून या संदर्भातील माझ अकाऊंट डिटेल शेअर करेल. स्वदेशी कू अॅपचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौत ट्विटरच्या माध्यमातून नेहमी रोखठोक मतं मांडत आली आहे. यामुळे अनेकदा मोठे वाद निर्माण झाले असून तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. ट्विटरवर कंगनाकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेवरही अनेकदा ट्विटरकर आक्षेप घेत असतात.

koo अॅप विषयी बोलायचं झालं तर या अॅपनं आत्मनिर्भर भारत अ‍ॅप्लिकेशन चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. 10 महिन्यांपूर्वीच हे अॅप लाॅन्च झालं होतं. या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे.

Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अ‍ॅपमध्ये आहे. Koo चा वापर अ‍ॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो.

महत्वाच्या बातम्या –

राठोडांचा पाय आणखी खोलात! वनमंत्री संजय राठोड ग.जाआड?

आता ‘या’ प्रकारे तुम्ही देखील व्हाल मालामाल, आहे खूपच धमाकेदार प्लान!

…..म्हणून सुशांतच्या बहिणीविरोधात एफ.आयआर दाखल, रियानं केले ‘हे’ ध.क्कादायक आरोप!

सोन्याचा आजचा भाव, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी सोनं महागलं, वाचा ताजे दर

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?