पुणे | करुणा धनंजय मुंडे यांनी आज पुण्यात एका कामगार संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी आहे, असं म्हटलं आहे.
धनंजय मुंडे जेव्हा स्वत: माझ्याजवळ आणि मिडियासमोर येतील आणि ‘पम्मी, तुम जिती मै हारा’ असं जेव्हा म्हणतील, शपथविधीमध्ये जेव्हा ते माझं नाव घेतील तेव्हाच मला न्याय मिळाला असं मी समजेन, असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यभरात पक्षाचा विस्तार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
धनंजय मुंडेंना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी सोळा वर्षाची होते. ही जास्त काही बोलणार नाही असं म्हणून त्यांनी मला या प्रकरणात ढकललं. ही कुणाला काही बोलणार नाही, काही दिवस फडफडेल आणि घरात शांत बसून राहील असं त्यांना वाटलं असावं. परंतु देवाला काही वेगळेच मंजूर होतं, असंही त्यांनी म्हटलं.
माझ्या पक्षाचा नारा वेगळा आहे. कार्यकर्ता समोर असेल आणि त्याच्या पाठीमागे करुणा मुंडे असतील. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर आधी कार्यकर्त्यांना उमेदवारी देईन, असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
1998 पासून मी भारतीय जनता पक्षात होते. पाच महिने मी पक्षाचं काम केलं. मी बाहेर जाणं माझ्या नवऱ्याला आवडत नसल्यामुळे मी पक्ष सोडून दिला आणि घरात बसले, असंही करूणा मुंडे यांनी सांगितलं आहे.
मी आता माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं. मी खूप चांगलं करतेय असं देखील त्यांनी मला सांगितलं आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडून मला आतापर्यंत न्याय मिळाला नाही, मी स्वतः न्याय मिळवून घेतला, असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत पण त्यांनी…”
चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक
पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम
“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…”
पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर