“धनंजय मुंडेंचे अनेक बायकांशी अनैतिक संबंध, पवारांनी मुंडेंना पदावरून हाकललं पाहिजे”

मुंबई | करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माझ्या आईंची मुंडेंनी हत्या केली आहे. पवारांनी मुंडेंना मंत्री पदावरून हकललं पाहिजे. माझ्यापासून दोन मुलांना जन्म देऊन त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडलं, असं त्या म्हणाल्यात.

धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला.

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य समोर येईल असे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून हकलण्याची मागणी त्यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा शर्मा यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल” 

करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या… 

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर! 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा