‘धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली’; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत.

करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला.

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य समोर येईल असे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

एखादी वाईट काम करणारी महिलादेखील इतके क्रमांक वापरत नाही मग धनंजय मुंडेच इतक्या मोबाइल क्रमांकाचा वापर का करतात, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला आहे.

धनंजय मुंडे हे खोट्या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे हे स्वतः 10 मोबाईल क्रमांक वापरत आहेत. एवढे क्रमांक धनंजय मुंडे कशासाठी वापरत आहेत, असा सवाल करुणा शर्मा यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर! 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा 

पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा! 

केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच…