‘…तर आम्ही राजकारण सोडू’; अरविंद केंजरीवालांचं थेट मोदींना चॅलेंज

नवी दिल्ली | आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आता भाजपला थेट चॅलेंज दिलं आहे. काही महिन्यांवर असलेल्या दिल्लीत महापालिकेच्या निवडणुकीवरून राजकारण पेटलं आहे.

दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका वेळेत घेवून दाखवा, तुम्ही निवडून आलात तर आम आदमी पक्ष आपलं राजकारण सोडेल, असं थेट आव्हान केजरीवालांनी भाजपला दिलं आहे.

केंद्र सरकार सध्या दिल्लीत अस्तित्वात असलेल्या तिन्ही महापालिकांचं एकत्रिकरण करण्याचा विचार करत आहे. परिणामी दिल्लीत महापालिकेचं राजकारण पेटणार आहे.

दिल्लीत एकच मोठी महापालिका असावी अशी भाजपची इच्छा आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. परिणामी आम आदमी पक्ष सत्तेसाठी प्रयत्न करणार आहे.

केजरीवालांनी आता थेट मोदींवर टीका करायला सुरूवात केल्यानं आम आदमी पक्ष भाजपला लक्ष्य करत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, 2014 च्या आसपास देशाच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत होत्या. त्यातील एक म्हणजे आम आदमी पार्टीचा उद्य होता.

आपच्या स्थापनेपासून आठ वर्षात आपनं दोन राज्यात प्रचंड बहूमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. परिणामी आता देशपातळीवर भाजपला पर्याय म्हणून आपची चर्चा होत आहे.

भाजपला देशभरात मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा झाला असला तरी दिल्लीत मात्र तो होताना दिसत नाही. भाजपला दिल्लीत अद्यापी सत्ता स्थापन करता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘8 वर्ष देश चालवल्यानंतर पंतप्रधानांना…’; केजरीवालांनी भाजपला झाप झाप झापलं 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…