मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच अडचणीत सापडली. केतकी चितळे प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

केतकी चितळेचा जामीन अर्ज अखेर मंजूर झाला आहे. ठाणे न्यायालयाकडून केतकी चितळेचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे.

25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर केतकीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. केतकीचा जामीन मंजूर झाला असला तरी तिचा मुक्काम अद्यापही तुरूंगातच आहे.

शरद पवारांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे न्यायालयात 21 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत केतकीचा मुक्काम ठाणे पोलिस ठाण्यातच असणार आहे.

केतकीचा जामीन मंजूर झाला असला तरी पुढचे पाच दिवस तिचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी केतकीला अॅट्रोसिटी अंतर्गत अटक केली होती. अखेर 25 हजारांच्या जातमुचलक्यावर केतकीचा जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, केतकी चितळेने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त केला जात होता. राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांनीही केतकीविरोधात तीव्र नाराजी दर्शवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”

इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…

मोठी बातमी! नवाब मलिकांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

राहुल गांधींची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय