‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर अत्यंत खालच्या शब्दात टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं आहे.

एक मुलीने शरद पवार यांच्यावर विकृत वक्तव्य केलं. घरी आई वडील आहेत की नाही. घरचे काही संस्कार देतात की नाही. हे टाळलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता, तो आज देशाची दिशा भरकवटत आहे. मी मागे म्हटलं होतं की आमचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर गदाधारी आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेनेचं हिंदुत्व गधादारी आहे, असं ते म्हणालेत.

आमचे तुमच्यासोबतचे जुने फोटो बघून तुमचा तसा गैरसमज होत असेल. मात्र आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गध्याला सोडून दिलं आहे. शेवटी गाढव ते गाढवच, गाढवाने आम्हाला लाथ मारण्याआधी आम्हीच त्यांना लाथ मारली, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो” 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले… 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…” 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान