खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!

जळगाव | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कित्येक दशके काम करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षांतर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

एकीकडे एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केल्यानं भाजप नेते आणि खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. तर दुसरीकडे जळगाव मधील भाजप कार्यालयात खडसे यांची प्रतिमा अद्याप देखील ठेवण्यात आली आहे. भाजप कार्यालयात खडसेंची प्रतिमा अद्याप देखील असल्यानं अनेकांना गोंधळात टाकलं आहे.

बळीराम पेठेतील ‘वसंत स्मृती’ हे जळगाव मधील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय आहे. वसंत स्मृती कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकनाथ खडसे यांची प्रतिमा आहे. खडसे यांनी पक्षांतर केल्यानंतरही या कार्यालयातील खडसेंची प्रतिमा हटविण्यात आली नाही. भाजप कार्यालयात खडसे यांची प्रतिमा अद्याप असल्यानं जळगावातील भाजप पदाधिकार्यांमध्ये खडसेंबद्दल आदरयुक्त दरारा कायम असल्याचं लक्षात आलं आहे.

आज या कार्यालयात जळगाव मधील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होती. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे बरेच नेते कार्यालयात उपस्थित राहिले होते. तसेच माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन देखील या बैठकीला उपस्थित राहिले होते.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या अनेक नेत्यांनी खडसे यांची कार्यालयातील प्रतिमा पहिली. मात्र, एकनाथ खडसे यांच्या कार्यालयात  असणाऱ्या प्रतिमेच्या मुद्द्यावरून कोणीही भाष्य केलं नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या अनेक नेत्यांनी आपलं काम उरकून कार्यालयातून काढता पाय घेतला.

मात्र, जळगाव मधील पत्रकारांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी गिरीश महाजन यांना खडसे यांच्या या प्रतिमेविषयी सवाल केला. यावेळी ही प्रतिमा लवकरच हटविण्यात येईल, असं म्हणत गिरीश महाजन देखील कार्यालयातून निघून गेले.

भारतीय जनता पार्टी हा पक्ष  विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कोणता एक व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराने पक्षाचं कोणतंही नुकसान होणार नाही, असंही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी खडसे यांनी देखील हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन् शेवट भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचं नि.धन

पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!