कोरोनातून बरं झालेल्या व्यक्तीवर झाला भयंकर परिणाम; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनावर मात केलेल्यांमध्ये पोस्ट कोविड लक्षणं दिसून येत आहेत. कुणाला डोकेदुखी, कुणाला अशक्तपणा, कुणाला थकवा अशा समस्यांचा सामान्यपणे समावेश आहे. पण एका व्यक्तीवर कोरोना संसर्गाचा असा भयंकर परिणाम झाला आहे.

अमेरिकेतील 72 वर्षीय व्यक्ती कोरोनाने संक्रमित झाली. कोरोनावर तिने मातही केली. पण आता कोरोनाच्या अतिशय दुर्मिळ आणि भयंकर दुष्परिणामाचा सामना करावा लागला (Coronavirus side effects). युरोलॉजी केस स्टडीजमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

न्यूज ट्रॅक लाइव्हच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीला Pyoderma Gangrenosum झाल्याचं निदान झालं. एक वेदनादायी स्थिती आहे. त्याच्या त्वचेवर मोठं स्किन अल्सर तयार झाले. त्याच्या टेस्टिकल्सवरील (Testicle) त्वचेला अल्सर पडले. त्याच्या टेस्टिकल्सवरील बाहेरील त्वचा पूर्णपणे नष्ट झाली. त्याचा प्रायव्हेट पार्ट फुटला.

नोवा साउथ ईस्टर्न यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ एलोपॅथिक मेडिसीनचेप्रमुख लेखक मशुटा हसन यांंनी सांगितलं की, कोरोनामुळे त्वचेसंबंधी आणि अवयवातंर्गत सूज येण्याच्या समस्या बळावत आहे, अशी बरीच प्रकरणं आहेत.

Mashuta Hasan यांनी सांगितलं, कोरोना संक्रमणानंतर Pyoderma Gangrenosum आणि त्यानंतर त्यामुळे होणाऱ्या Genital Ulcers बाबत आम्हाला समजलं.

रुग्णाच्या टेस्टिकल्सची बाह्यत्वचा पूर्णपणे खराब झाली होती. बऱ्याच कालावधीच्या उपचारानंतर त्याच्या टेस्टिकल्सवरील जखम बरी झाली आहे. आता त्याला टॉयलेटला जाण्यातही काही त्रास होत नाही.

याआधी अमेरिकेतीलच एका 30 वर्षीय व्यक्तीने कोरोनानंतर आपला प्रायव्हेट पार्ट लहान झाल्याचा दावा केला होता. मागील वर्षी जुलै महिन्यात त्याला कोरोना झाला होता. उपचारानंतर तो घरी आला तेव्हा आधीच्या तुलनेच त्याच्या प्रायव्हेट पार्टचा आकार लहान झाल्याचं त्याला दिसलं.

महत्वाच्या बातम्या- 

‘किरीट सोमय्यांना मानसिक धक्का बसलाय’, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार