मुंबई | गेले तीन ते चार दिवस पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) Popular Front of India या संघटनेवर केंद्र सरकारने कारवाईची मोहीम राबविली आहे. केंद्र सरकारने पीएफआयशी संबंधित अनेकांना अटक केली आहे.
आज (दि. 28) पहाटे केंद्र सरकारने पीएफआय आणि तिच्यासोबत संबंधित अनेक संघटना बेकायदेशीर असल्याचे जाहीर करत त्यांच्यावर बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ही कारवाई केली आहे. यात काल (दि. 27) रोजी एका दिवसात तब्बल 170 जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांत ही छापेमारी झाली.
केंद्र सरकारने पीएफआय आणि तिच्यासोबत संलग्न अनेक संस्थांवर पुढील पाच वर्षे बंदी घातली आहे. या निर्णयावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भाष्य केले आहे.
पीएफआय संघटनेला अरब देशांतून टेरर फंडिंग (Terror Funding) मिळत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ जाहीर करत हा आरोप केला आहे. पीएफआयवर निर्बंध लावल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देतो, असे किरीट सोमय्या म्हणाले.
या संघटनेवर कारवाई करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही लोकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय
न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात केंद्राचा मोठा निर्णय’; बेकायदेशीर ठरवत पुढील…
“…तोपर्यंत नरेंद्र मोदी मला संपवू शकत नाहीत”; पंकजा मुंडे यांचे पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य
गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला! फडणवीस म्हणाले…