“लवासाप्रकरणी शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार?”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या डझनभर नेत्यांची नावे जाहीर केले आहेत.

सक्तवसूली संचनालय म्हणजे ईडी सध्या राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर छापेमारी करत आहे. अशातच ठाकरे सरकारकडून ईडीवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच लवास प्रकल्पामध्ये पवार कुटुंबीयांचा समावेश असल्याबाबत स्टेटमेंट दिलं आहे. त्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यावरूनही राज्यात वाद रंगला आहे. सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लवासा प्रकरणी उच्च न्यायालयाचे स्टेटमेंट आले आहे. घोटाळा करणारे शरद पवार, अजित पवार हे ठाकरेेंचे पार्टनर आहेत. ज्यांनी लवासाबाबत सत्तेचा दुरूपयोग केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मी शांत बसणार नाही. पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार?, असा सवाल सोमय्या यांनी ठाकरेंना विचारला आहे. परिणामी वाद वाढला आहे.

राज्य पोलीस दलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याच्या मुद्द्यावर देखील सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारनं मुंबई पोलीस आयुक्तपदी माजी महासंचालक संजय पांडे यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आलेले पांडे हे दिग्गज अधिकारी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी