“उद्धवजी, आता वेळ आलीये… शरद पवारांसमोर झुकू नका”

मुंंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप त्यांच्या विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणा चर्चेत आहेत.

अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अप्लसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.

त्यावरून आता महाविकास आघाडीतील पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करत आहेत तर दुसरीकडे भाजप ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सरकारने सहकार्य करावं, असं शेलार म्हणाले आहेत.

देव, धर्म आणि देश यावर हे बोलायचे नाहीत. उद्धवजी, आता वेळ आलीये. दाऊद आणि त्यांच्या हस्तकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, असं शेलार म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्यासमोर झुकू नका. नवाब मलिक यांची हकालपट्टी करा. या तीन पक्षांमध्ये आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडूनच आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष वाया गेलेले आहेत. उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

हे मर्दांचं सरकार आहे म्हणणारे या प्रकरणात बोटपेचीची भूमिका का घेत आहे?, असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित आहे.

दरम्यान, भाजपचं सरकार निर्णयशूर आहे. बोरूबहाद्दरांना आम्ही याचं ट्रेनिंग द्यायला तयार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्षणात सर्व उद्ध्वस्त झालं, युक्रेनमधील काळजाचा ठोका चुकवायला लावणारा व्हिडीओ व्हायरल

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला