“फडणवीसांच्या नावामागे ‘उप’ शब्द लावायला फार जड जातं”

मुंबई | महाराष्ट्रातील 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर सर्वांनाच अनपेक्षित असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

ऐनवेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार, राज ठाकरे यांनी या विषयावर भाष्य केल्यानंतर आता संजय राऊतांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे.

मला अजूनही फडणवीसांबद्दल बोलताना तोंडामध्ये उपमुख्यमंत्री येत नाही. एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण बोलत आलोय, असं संजय राऊत म्हणाले.

उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला फार जड जातंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तर देवेंद्रजींच्या बाबतीत असं काही झालं किंवा होत असेल हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले.

भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं त्यानुसार फडणवीस वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. त्यामुळे आता यावर मी काय बोलू, अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवारांना दुसरा झटका

बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले…

उपमुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल!