Top news महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

sommya uddhav e1643276541857
Photo Credit- [email protected]

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर खात्याने कारवाई सुरु केली आहे. यावरून खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेनेकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर केला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

मची मुलं कोणत्या शाळेत शिकतात अशी धमकी शिवसेनेकडून केंद्रीय यंत्रणांच्या तपास अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. तसेच या संबंधी माझ्याकडे पुरावे असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई झाली होती. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरी देखील आयकर विभागाने छापा टाकला होता.

जानेवारी महिन्यामध्ये भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…”