“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला अन् हिरवा हातात घेतला”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमरावतीत झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. सोमय्या सध्या अमरावती जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतच, पण उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे हे 1992-93 च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचार म्हणता, असं किरीट सोमय्या म्हणालेत.

हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे आणि ठाकरे-पवारांचे सरकार यांचे घोटाळे बाहेर आले तरीही किरीट सोमय्यालाच थांबवतात. कोल्हापुरातही सोमय्यालाच थांबवलं. हिंदुंवर अत्याचार होत असतात तेव्हा देखील तिथे जाण्यास किरीट सोमय्यांवर प्रतिबंध लावले जातात, असं सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

12 नोव्हेंबरला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या समर्थनाने तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आलं. त्याच दिवशी मला यायचं होतं, पण मला प्रतिबंध घातला. मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीत आलोय, असं सोमय्या म्हणालेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा ते घोटाळा उघडकीस आणणार आहेत, असा दावा करण्यात येत आहे.

या संदर्भात दुपारी 12 वाजता किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होणार असून ते या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका! 

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…”