“अहो फडणवीस, राज्याची काय देशाची निवडणूक परत घ्या”

मुंबई |  जर विरोधकांच्या हिम्मत असेल तर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा सामोरं जावं, असं आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. ‘फडणवीसांच्या असेल हिम्मत तर…’ या वक्तव्याची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याची काय देशाची निवडणूक परत घ्या, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा घ्या, असं शरद पवार म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे सरकार तीन चाकांच्या रिक्षाचं सरकार आहे. या रिक्षाची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पकाळाचं आहे. हे सरकार लवकरच पडेल, अशी टीका भाजपने महाविकास आघाडीवर केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक घेण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.

दरम्यान, फडणवीसांच्या असेल हिम्मत तर… हेवाक्य सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल झालं. अनेक नेटकऱ्यांनी भाजपला तसंच फडणवीसांना अनेक सल्ले दिले. आता शरद पवार यांच्या प्रत्युत्तरावर भाजपचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….!

-तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतात, ‘इंदोरीकरांमुळे कीर्तनाचा दर्जा घसरतोय!’

-“तृप्ती देसाई, तुम्ही नगरमध्ये पाय ठेवून दाखवाच”

-गेल्या 25 वर्षात इंदोरीकरांनी समाजात मोठ्या प्रमाणात प्रबोधन घडवलं- बाळासाहेब थोरात