कुटुंबासाठी महापालिकेकडून मिळणारी गाडी महापौरांनी नाकारली!

मुंबई : नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडून कुटुंबासाठी मिळणारी गाडी नाकारली आहे. या गाडीसाठी येणारा खर्च महापौर निधीमध्ये द्यावा, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांच्याकडे केली आहे.

महापौर निधीत वाढ होण्याकरिता ‘महापौर रजनी’ दात्यांना शंभर टक्के करमुक्तीची सवलत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पेडणेकर यांनी सांगितले.

महापौर निधीसाठी मदत करणऱ्या दात्यांना करात केवळ 50 टक्के सवलत मिळते. दात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के कर सवलत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचंही महापौर पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, माझ्या कुटुंबात मी, माझा नवरा आणि मुलगा असे तिघंच आहोत. एवढ्या लहान कुटुंबासाठी गाडीची गरज काय? माझ्या नवऱ्याला आणि मुलाला गाडीने फिरण्याची हौस नाही. कुटुंबाला मिळणाऱ्या गाडीऐवजी महापौर निधीसाठी मदत करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-