मुंबई | गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या भाषणाचे पडसाद अद्यापही पहायला मिळत आहे.
राज ठाकरेंच्या टीकेवर अनेक प्रतिक्रिया येत असताना आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल. पण त्यातून काही निघालं नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले. अशा गांडुळांना पोसण्याचं काम लोकांनी करू नये, असा खोचक सल्लाही किशोरी पेडणेकरांनी यावेेळी दिला.
मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना… खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांचाच त्यांच्यासाठी प्रयत्न होता, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
दोन वर्षापासून उद्धवजींच काम सर्व पाहत आहे. यांच्या तर बोलण्याच्या मोऱ्या तुंबल्या. आम्ही तर कामातून विकासाचा धडाका लावला.
बाळासाहेबांचे पक्के उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच आहेत. हे सिद्ध झालं. होतंच. पण लोकांच्या मनात कुठे तरी किंतू परंतु होतं. पण कालच्या राजकारणामुळे लोकांना कळलं. बाळासाहेबांचे सुपूत्रं आणि नातू हेच त्यांचे उत्तराधिकारी आहे, असा घणाघातही पेडणेकर यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवेल, असा घणाघात राज यांनी केला होता. यावरुन सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत”
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
राज ठाकरेंना अक्कलदाढ उशीरानं आली – संजय राऊत
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस