‘कोण होतीस तू, काय झालीस…’; गाण्यातून किशोरी पेडणेकरांचा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई | झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमास प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे. विविध क्षेत्रातील आणि नावाजलेल्या महिला या कार्यक्रमास हजेरी लावत असतात.

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. यावेळी त्याच्यासोबत इतर महिला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना विविध प्रश्न विचारुन धमाल करतात.

या कार्यक्रमात मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भावेंच्या आणि इतर महिलांच्या अनेक प्रश्नांची खुमासदार उत्तरे देऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली.

त्यांच्या दिलखुलास आणि मजेशीर उत्तारांनी कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. तसेच त्यांच्या उत्तरांतून त्यांनी त्यांचे विरोधक आणि सत्ताधारी यांची देखील फिरकी घेतली.

या कार्यक्रमातील एक खेळ म्हणजे, स्पर्धकाला एखाद्या गाण्याचे बोल ऐकवीले जातात, आणि त्यानंतर त्याच्यासमोर कोणता चेहरा येतो, हे विचारले जाते. पेडणेकर यांना देखील तसे ऐकवीले गेले.

‘कोण होतीस तू काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’, हे गाणे ऐकविल्या नंतर भावेंनी पेडणेकरांना कोणाचा चेहरा आठवला, असे विचारले. त्यावेळी त्यांनी मला ह्या गाण्यातून भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा चेहरा दिसल्याचे त्या म्हणाल्या.

त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांना दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, हे गाणे ऐकवीले गेले. त्यावर देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव घेतले.

या आगामी भागाच्या काही व्हिडिओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर टाकल्या आहेत. त्या भरपूर प्रचलीत झाल्या असून तुफान व्हायरल होत आहेत.

मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या आधी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकडा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या देखील आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या – 

कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव

एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…

“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका

अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले