कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’च्या नावावरुन शिवसेनेने शिंदे गटाला दिले नवीन नाव

मुंबई | नुकतेच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पडले. सदर अधिवेशन निदर्शने आणि घोषणांनी गाजले. सुरुवातीच्या दिवसात शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे गटाविरोधात घोषणा दिल्या.

तर शेवटच्या दोन दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनात गळ्यात फलक घालून उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना लक्ष केले गेले. त्यात त्यांनी ‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली ‘ असे म्हंटले होते.

त्यामुळे शिवसेना आता आक्रमक झाली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कुख्यात दहशतवादी संघटना ‘बोको हराम’ (Boko Haram) वरुन त्यांनी शिंदे गटाला ‘खोके हराम’ (Khoke Haram) असे नाव दिले आहे.

दिल्लीत आम आदमी पक्ष (AAP) आणि बिहारमधील नितीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाच्या (JDU) भाजप विरोधी संघर्षात त्यांनी महाराष्ट्रातील आमदारांचा खोके घेणारे आमदार असा उल्लेख केला.

त्यामुळे महाराष्ट्राचे नाव देशात बदनाम झाले. शिंदे गटाच्या आमदारांना देश, खोकेवाले आमदार अशा नावाने ओळखतो, असे शिवसेनेने म्हंटले आहे. त्यामुळे आता त्यांच्या आडनावांपुढे खोकेवाले लागले आहे, असेही शिवसेना म्हणाली.

काल (दि. 26) रोजी शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) युती केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय कळवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या – 

एकपात्री विनोदवीर मुनव्वर फारुकीच्या दिल्लीतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली; ठोस कारण…

“शिंदे गेले ते बरेच झाले, असंगाशी…”; उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर मोठी टीका

अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा दणका, एका माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा