‘इतक्या’ कोटींची संपत्ती आपल्या मागे सोडून गेले KK

मुंबई | प्रसिद्ध गायक केके (KK) यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री आणि गायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके हे फारच कमी मीडिया किंवा लाइमलाईटमध्ये असायचे. ते फारच क्वचित पाहायला मिळायचे.

कृष्णकुमार कुन्नथ यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याने श्रोत्यांना वेड लावलं आहे. त्यांचं प्रत्येक गाणं लोक आवडीने ऐकतात.

केके एक गाण गाण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये घेत असत आणि लाइव्ह कॉन्सर्टसाठी 10 ते 15 लाख रुपये घेत असत. ते करोडोंच्या मालमत्तेचे मालक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ऑडी कार खरेदी केली होती.

केकेंची गणना इंडस्ट्रीतील सर्वांत महागड्या गायकांमध्ये होते. त्याची एकूण संपत्ती 1.5 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. तसंच त्यांना घोडेस्वारीची खूप आवड होती. तेलुगू, तमीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये केके यांनी जवळपास 25 हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

दरम्यान, केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिलं आहे. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत.

केके यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा 

पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा! 

केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच… 

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त