‘त्या व्यक्तीला मी Mercedes-Benz बक्षीस म्हणून देणार’; नितेश राणेंची मोठी घोषणा

पुणे | पिंपरी चिंचवड येथील टाळगाव चिखली मधील रामायण मैदानावर भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. याला भाजप नेते आणि आमदार नितेश राणेंनी हजेरी लावली.

नितेश राणेंनी ट्विटरवरुन या स्पर्धेला उपस्थित राहिल्याचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये नितेश राणे हे स्टेजवर असून समोर बैलगाडा शर्यती सुरु असल्याचं दिसतंय.

नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष महेश लंगडे यांना टॅग करत देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत एक घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील त्यावर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं नितेश राणे म्हणालेत.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली.

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही नांगर घेऊन आलो आहे. ज्याचा बैलगाडा शर्यतींना विरोध आहे त्यांच्यासाठी, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा 

पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा! 

केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच… 

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त