KL Rahul लखनऊ संघाचा नवा कर्णधार! कॅप्टन होताच दिलं आश्वासन, म्हणाला…

मुंबई | आयपीएल 2022 चा (IPL 2022) मेगा लिलाव काही दिवसांनी पार पडणार आहे. याआधीही लखनऊने भारतीय सलामीवीर केएल राहुलची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली असून त्याला संघात सामील करून घेतलं आहे.

पंजाब किंग्जचा माजी कर्णधार केएल राहुल आयपीएल 2021 मध्ये लखनऊच्या नवीन फ्रँचायझीमध्ये सामील झाल्यानंतर आयपीएल 2022 चा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.

लखनऊ फ्रँचायझींनी कर्णधार केएल राहुलला सामील करून घेण्यासाठी 17 कोटींची मोठी रक्कम दिली आहे. लखनऊ फ्रँचायझींनी सामील होताच राहुलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची अधिकृत घोषणा केली.

यावर केएल राहुलने आनंद व्यक्त करत आभार मानले आहेत. कर्णधार बनवल्यानंतर केएल राहुलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सर्वांना माझा नमस्कार, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ,लखनऊच्या नवीन संघाचा भाग बनणं हा एक मोठा सन्मान आहे. लखनऊच्या लोकांसाठी मी माझे सर्वोत्तम देईन, असं आश्वासन देखील केएल राहुलने दिलं आहे.

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ फ्रँचायझीने अनकॅप्ड भारतीय खेळाडू रवी बिश्नोई आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस यांना देखील संघात स्थान दिलं आहे.

कर्णधार केएल राहुलला 17 कोटी रुपये, मार्कस स्टॉइनिसला 9.2 कोटी रुपये दिलेत, तर युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला 4 कोटी रुपयात खरेदी करण्यात आलं आहे.

दरम्यान, या मेगा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठे डाव लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या  आयपीएलची आता सर्वच जण वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस

दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत 

अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले… 

मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!