अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस

पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना कोरोना नियमांच पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडमुक्त गाव अभियान योजनेला बक्षिस दिलं जाणार असल्याची घोषणा केली आहे.

कोविडमुक्त गाव अभियान यशस्वी केलेल्या गावाला पहिले बक्षिस 50 लाखांच तर दुसर बक्षिस 25 लाखांच आणि तिसरे बक्षिस 15 लाखांच देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने राबविलेले कोवि़डमुक्त गाव अभियान उपयुक्त असून पुणे विभागातही कोविडमुक्त गावाची अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटांचा मुकाबला करत आहोत. हे मानव जातीवर आलेलं संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल.

नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आलेलं नाही. दोन वर्षांत विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान झालं आहे. कोविडचं संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीनं कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहिर करण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बिजेएसच्या सहकार्याने पुण्यातील काही गावांमध्ये राबविलेला हा उपक्रम संपुर्ण राज्यात राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील  इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईलं, असं त्यांनी सांगितलं.

कोविडमुक्त गाव अभियान हा प्रयोग यशस्वी केलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं.

कोविडमुक्त गाव अभियान राज्यस्तरावर राबविण्याकरिता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

तसेच कोणताही उपक्रम यशस्वी करण्यसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते, तो वैयक्तिक प्रयत्नांनी यशस्वी होत नाही. ग्रामीण भारताची सुत्र युवकांच्या हाती जात आहेत. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल,  असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत 

अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले… 

मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!  

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!