Top news खेळ

‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल

kl Rahul 1 e1643035388175
Photo Credit - Facebook/ KL Rahul

मुंबई | अवघ्या जगात सर्वाधिक प्रसिद्धी मिळवत असलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखलं जातं. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करतात.

भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल हा टी ट्वेंटी प्रकारातील अव्वल फलंदाज मानला जातो.

लखनऊ संघाचं नेतृत्व करताना राहुलनं लखनऊला प्ले ऑफमध्ये पोहोचवलं आहे. आपल्या बॅटमधून राहुलनं यंदाच्या हंगामात देखील धावांची टांकसाळ उघडली आहे.

14 सामन्यात राहुलनं दोन शतकांच्या सहाय्यानं तब्बल  537 धावा फटकावल्या आहेत. राहुलनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर लखनऊला एकहाती सामने जिंकून दिले आहेत.

2018-2022 अशा सलग पाच हंगामात राहुलनं 500 च्या वर धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा राहुल हा पहिलाच फलंदाच ठरला आहे. परिणामी राहुलची जोरदार चर्चा होत आहे.

डेव्हिड वाॅर्नर, विराट कोहली, शिखर धवन या दिग्गज फलंदाजांनी आतापर्यंत पाचवेळा 500 धावा एका हंगामात केल्या आहेत. या पंक्तित आता राहुल आला आहे.

दरम्यान, केएल राहुल हा भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. अशात आता येणाऱ्या काळाती काही सामने त्याचं भवितव्य ठरवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन” 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?” 

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…