मुंबई | गेले अनेक दिवस कमाल आर खान (Kamal R Khan) म्हणजेच केआरके (KRK) हे नाव सतथ चर्चेत आहे. केआरके हा नेहमी त्याची वक्तव्ये आणि मतांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.
बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक असलेल्या केआरकेला KRK काही दिवसांपूर्वी अटक देखील झाली होती. केआरके नेहमी आपल्या वादग्रस्त कृत्यांतून चर्चेत असतो. समाज माध्यमांवर केआरके भरपूर प्रमाणात लोकप्रिय आहे.
केआरके सध्या तुरुंगातून नुकताच बाहेर पडला असून तो पुन्हा ट्विटरवर सक्रिय झाला आहे. त्याने अलिया भट आणि रणवीर सिंग यांच्या ब्रम्हास्त्र (Brahmastra) चित्रपटावर ट्विट केले आहे.
त्याचबरोबर त्याने विक्रम वेधा (Vikram Vedha) या चित्रपटाचे समीक्षण करणार आहोत, असे देखील सांगितले आहे. आता केआरकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रवेश करायचा आहे, अशी चर्चा आहे.
त्याने संघात प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री आणि संघाचे मोठे स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना विनंती केली आहे.
केआरकेने त्यासंबंधी एक ट्विट केले आहे. त्याने ‘जर आरएसएसला गरज असल्यास मी आरएसएसमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे’, असे ट्विट केले आहे. त्याने या ट्विटमध्ये दोघांना संलग्न केले आहे.
त्यामुळे समाज माध्यमांवर केआरकेची टिंगल केली जात आहे. केआरकेने यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त आणि असंबंध ट्विट केली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“काही आमदार हात पाय तोडण्याची भाषा करतात, अरे काय तुझ्या बापाच्या”
गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!
…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण
‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत
Honourable @DrMohanBhagwat Ji, I am ready to join @RSSorg if #RSS needs me. 🙏🏼 @Dev_Fadnavis
— KRK (@kamaalrkhan) September 19, 2022