मुंबई | प्रतिवर्षी शिवसेनेकडून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेतला जातो. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधन करतात.
पण यावेळी शिवसेनेतून बंड करुन गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे दसरा मेळावा वाद सुरु झाला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील खरी शिवसना आपली म्हंटली आहे.
आणि त्यामुळेच त्यांनी देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेला अर्ज केला आहे. आता शिवाजी पार्कात यंदा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दसरा मेळावा घेणार की, शिंदे गट हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
आता या वादात भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी खरी शिवसेना (Shivsena) कोणाची आणि कोणी दसरा मेळावा घ्यावा, यावर भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना खरी असल्याचे जनतेचे मत आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी उभी केलेली शिवसेना ही शिंदे यांनी पुढे चालविली आहे. आणि त्यामुळे त्यांना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचे लाड म्हणाले.
जनतेला देखील दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे सोने लुटायला आवडेल, असे प्रसाद लाड म्हणाले. ते एका वृत्त वाहिनीसोबत संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
त्याबरोबर खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे. पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी, संघटनात्मक लोकप्रतिनिधी तसेच देशातील 8 राज्यांनी शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना म्हंटल्याने त्यांना पाठिंबा मिळाला आहे.
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. परंतु बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी यावेळी मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी; अभिनेता केआरके संघात प्रवेश करणार!
गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आत्ताच व्हा सावध!
“काही आमदार हात पाय तोडण्याची भाषा करतात, अरे काय तुझ्या बापाच्या”
…त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ट्विट डिलीट करावं लागलं
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण