लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | भारतरत्न आणि गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची बाधा झाल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी आयसीयूमध्ये आहेत.

लतादीदींचं वय जास्त असल्यानं कोरोना झाल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच काँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांना न्युमोनिया झाल्याची माहिती समोर आली होती.

पहिले काही दिवस लतादीदी उपचारास प्रतिसाद देत नव्हत्या. त्यामुळे डाॅक्टर देखील चिंतेत होते. त्यानंतर डाॅक्टरांनी वेट अँड वाॅचची भूमिका घेतली होती.

अशातच लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आता हेल्थ अपडेट शेअर केलं आहे. लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये असून त्यांच्या प्रकृतीत आज थोडीशी सुधारणा झाल्याचं दिसून आल्याची माहिती मिळाली आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी देखील एक परिपत्रक जारी करत अफवा पसरवू नका, असं आवाहन केलं होतं.

लतादीदींच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लतादीदींना कोरोना झाला होता.

दरम्यान, लतादीदींचे सर्व चाहते आता त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

सलमान खानचं टेन्शन संपेना! शेजाऱ्यानेच केलेत धक्कादायक आरोप

अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस

दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत 

अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…