“ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात 150 ते 200 उमेदवार उभे करा”

सोलापूर | ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी येत्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 150 ते 200 उमेदवार उभे करा, असा अजब सल्ला माजी आमदार आणि महाराष्ट्र वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

भाजपला गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर ईव्हीएमच्या आधारावर सत्ता मिळाली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास चित्र वेगळं असेल, आता ईव्हीएमविरोधात अहिंसात्मक आंदोलन उभं करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सध्या आरएसएसकडून देश चालवला जातोय. ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याने त्यांना निवडणुकीत हरवणं सोपं नाहीये. त्यामुळे जास्तीत-जास्त उमेदवार उभे करून निवडणूक प्रक्रिया कोलमडून टाकणं गरजेचं असल्याचं मत मानेंनी व्यक्त केलं आहे. 

प्रबोधनकार ठाकरे माझे गुरू आहेत. त्यामुळे मातोश्रीचं मला वावडं नाहीये. शिवसेनेबरोबर निवडणुकीबाबत बोलणी करेन, असंही ते यावेळी म्हणाले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 76 जागांची मागणी केली आहे. 2 ते 3 दिवसात जागा वाटप होईल, अशी माहिती मानेंनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या-