निले निले अंबर पर चाँद कब आयेगा….?; आंबेडकर शेवटपर्यंत ओवैसींची वाट पाहणार!

मुंबई | फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आमचा एमआयएमसोबत युतीचा प्रयत्न राहील. ओवैसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही फरक नाही, काँग्रेस आघाडीसाठी लोकसभेसारखंच वागतंय. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय मात्र ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असं म्हणत विधानसभेला काँग्रेससोबत जाणार नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

तीन ते चार वेळा काँग्रेस आमच्यासोबत खेळत राहिली. काँग्रेसमध्ये लोकसभेवेळी आणि आताही कोणताही फरक नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणार नाही, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे आंबेडकरांचं नाव न घेता ते आम्हाला ते सन्मानजनक वागणूक देत नाहीत. 288 पैकी फक्त 8 जागा द्यायला तयार आहेत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबतची युती तोडतो आहोत, असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे.

आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आमची यादी जाहीर करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-