लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

पुणे : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पुण्यात बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ असं त्यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या पक्षाची स्थापना करुन त्यांनी प्रकाश आंबेडकरांना गोत्यात आणल्याचं आहे. 

लक्ष्मण माने नव्या पक्षाची घोषणा करताना माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. 

29 जुलै पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीची पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार आहोत. विधानसभेला डाव्या आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण मानेंनी सांगितलं. 

भाजपचा पराभव करण्याऐवजी वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या दहा ते बारा जागा निवडून आल्या. त्यामुळं मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवाद आणि धार्मिक संघटनांबरोबर जाणार नाही, असं मानेंनी सांगितलं. 

भाजप आणि युतीला मदत होईल अशी कोणतंच काम करणार नसल्याचंही मानेंनी स्पष्ट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

आजारपणातून बरं होताच अकबरुद्दीन ओवैसींकडून ‘15 मिनिट’वाल्या वक्तव्याचा पुनरुच्चार

-फडणवीसांची महाजनादेश यात्रा; उद्घाटनाला शहा तर समारोपाला मोदी

-विराट कोहलीला इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी मिळणारी किंमत ऐकून थक्क व्हाल!

-मॉब लिंचिंगविरोधात 49 कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र

-असला कसला विश्वविजेता?; आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा संघ अवघ्या 85 धावात गारद