जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

तुम्ही पांढरा आणि ब्राऊन तांदुळ दैनंदिन आहारात सर्रास वापरत असाल. मात्र तुम्ही कधी काळ्या तांदुळ विषयी ऐकलं आहे का? या तांदळाचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, हे तांदुळ औषधी गुणांनी भरलेले आहे. व्हिटामिन ई, फायबर, प्रथिने आणि अँटी.ऑक्सिडेंटने समृद्ध असलेला काळा तांदुळ भारतातही मुबलक प्रमाणात आढळतो.

तांंदुळ म्हटलं की, पहिली आठवण येते ती भाताची. तांदळाचे अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यामध्ये बासमती, कोलम, उकडीचे तांदुळ असे बऱ्याच प्रकारचे तांदुळ असलेले पहायला मिळतात.

या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चिनी माणसांना हा लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास ‘फॉरबिडन राईस’ असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला. यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.

साधारण भातशेतीपेक्षा काळ्या तांदळाची लागवड कमी करतात. तामिळनाडू, बिहार, राजस्थान, मुंबई, हरियाणा आणि परदेशातही या तांदळाची मागणी वाढत आहे. 300 ते 350 रुपयांपर्यंत किलो या भावाने हे तांदुळ विकले जातात.

काळ्या तांदळामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते, जे हृदयासाठी चांगले मानले जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. या काळ्या तांदळामध्ये फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

अ‍ॅथेसॅनिनच्या विशिष्ट प्रकारच्या घटकामुळे या तांदळाचा रंग काळा असतो. हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

या काळ्या तांदळामध्ये भरपूर मात्रेत फायबर आढळतं जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. याने पोट फुलणे आणि पचनसंबंधित तक्रारही दूर होते. दररोज याचे सेवन केलं जाऊ शकतं. अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –

सोन्याचा आजचा भाव, 9,000 रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच येणार बाजारात

उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, 5 लाखांहून आहे कमी किंमत

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे