“आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं”

मुंबई | निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो.

करण नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. अशातच करण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

चित्रपटसृष्टीविशयी केलेल्या एका वक्तव्यामुळे करण चांगलाच चर्चेत आला आहे. एबीपी आयडियाज ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात करणनं हे वक्तव्य केलं होतं.

आता भारतीय चित्रपट उद्योगाला बॉलीवूड म्हणणे बंद केले पाहिजे, असं करणनं म्हटलं आहे. हा हॉलीवूडच्या आधारे बनलेला शब्द आहे.

आता याचे नाव ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ असायला हवे. कारण यात तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सिनेमांचा समावेश आहे, असं करणनं म्हटलं आहे.

करण पुढे म्हणाला की, याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण ‘पुष्पा’ सारख्या चित्रपटातून पहायला मिळते. राजमौली हे या क्षणी स्पष्टपणे सर्वात मोठे भारतीय चित्रपट निर्माते आहेत.

कोणीही राजामौली यांंच्याकडून हा खिताब काढून घेऊ शकत नाही, असं करणनं म्हटलं. त्यामुळे सध्या करणचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

  अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम

  “ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”

  ‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान

  ‘अनिल परबांचं रिसाॅर्ट तोडून दाखवणार’; किरीट सोमय्या आक्रमक