तुमच्या मुलाच्या शिक्षणाची चिंता मिटणार! LIC ची नवीन योजना लाँच

LIC Amritbaal Scheme l सरकारी विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) ने एक नवीन विमा योजना लाँच केली आहे. LIC ने ‘एलआयसी अमृतबल’ असे या योजनेला नाव दिले आहे. तसेच ही योजना ‘प्लॅन ८७४’ म्हणून देखील ओळखली जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे LIC ने ही योजना लहान मुलांसाठी केली आहे. त्यामुळे ही योजना एकप्रकारे बाल विमा पॉलिसीच (LIC Amritbaal Scheme) असणार आहे. सरकारने लाँच केलेली ही योजना आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024 पासून खरेदी करता येणार आहे. तर आपण आज ‘एलआयसी अमृतबल’ योजनेचे काय फायदे मिळतील ते जाणून घेऊयात…(LIC Amritbaal Scheme)

देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची ‘एलआयसी अमृतबल’ योजना ही वैयक्तिक, बचत आणि जीवन विमा योजना आहे. ही योजना विशेषतः मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पुरेसा निधी तयारकरण्यासाठी तयार केली आहे. याशिवाय मुलांच्या इतर गरजा देखील पूर्ण करण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे.

LIC Amritbaal Scheme l 1000 रुपयांवर 80 रुपये नफा मिळणार :

या योजनेत एलआयसी प्रत्येक 1000 विम्याच्या रकमेसाठी 80 रुपयांच्या प्रमाणात हमी परतावा देते. त्याची खास गोष्ट म्हणजे 80 रुपयांचा हा परतावा विमा पॉलिसीच्या विम्याच्या रकमेमध्ये जोडला जातो. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर 1 लाख रुपयांचा विमा काढला आहे असे समजू शकता. तसेच LIC तुमच्या विम्याच्या रकमेत 8000 ची हमी रक्कम देण्यास सक्षम असेल. हा हमी परतावा प्रत्येक वर्षी पॉलिसी वर्षाच्या शेवटी जोडला जाईल आणि संपूर्ण पॉलिसी मुदत संपेपर्यंत चालू राहील. (LIC Amritbaal Scheme)

पॉलिसी कोणासाठी घेता येईल? (LIC Amritbaal Scheme) :

‘एलआयसी अमृतबल’ ही पॉलिसी 30 दिवसांपासून ते 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी घेतली जाऊ शकते. या पॉलिसीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असणार आहे. या पॉलिसीसाठी 5, 6 किंवा 7 वर्षांच्या शॉर्ट टर्म प्रीमियम पेमेंट अटी उपलब्ध आहेत. तर कमाल प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे आहे.तुम्हाला सिंगल प्रीमियम पेमेंट पर्याय निवडायचा असल्यास तुम्ही तो देखील निवडू शकता. तसेच योजनेअंतर्गत तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल. तुम्ही 5व्या, 10व्या किंवा 15व्या वर्षी मनी बॅक प्लॅनप्रमाणे मॅच्युरिटी सेटलमेंट घेऊ शकता.

News Title : LIC Amritbaal Scheme launched

महत्वाच्या बातम्या –

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत

जगातील 1.6 कोटींहून अधिक घरे होणार प्रकाशमय; हा प्रकल्प सुरु

कंपनीच्या म्हणण्यानुसार… Paytm App व QR कोड बंद होणार?

अवघ्या काही तासात संपणार व्हॅलेंटाईन वीक! आता सुरु होणार अँटि-व्हॅलेंटाईन वीक; वाचा वेळापत्रक

शेतकऱ्यांनो केंद्र सरकारच्या या 4 योजनांचा घ्या फायदा; मिळेल आर्थिक मदत