Today Horoscope l मेष :- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर आनंद आणि सहकार्य वाढेल.
वृषभ :- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. लोकांची दिशाभूल करू नका. वैवाहिक जीवनात पती-पत्नीचे चांगले संबंध वाढतील.
मिथुन :- आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख-समृद्धी वाढेल. मन प्रसन्न राहील.
कर्क :- जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
सिंह :- स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता अधिक आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
Today Horoscope l कन्या :- आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी वेळ चांगला राहील.
तूळ :- घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.
वृश्चिक :- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या. विवाहाशी संबंधित कामात येणारे अडथळे दूर होतील.
धनू :- आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
मकर :- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.
Today Horoscope l कुंभ :- काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
मीन :- अतिघाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. दूरदेशातून आई-वडील घरी पोहोचतील. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
महत्वाच्या बातम्या –
जगातील 1.6 कोटींहून अधिक घरे होणार प्रकाशमय; हा प्रकल्प सुरु
कंपनीच्या म्हणण्यानुसार… Paytm App व QR कोड बंद होणार?
अवघ्या काही तासात संपणार व्हॅलेंटाईन वीक! आता सुरु होणार अँटि-व्हॅलेंटाईन वीक; वाचा वेळापत्रक
शेतकऱ्यांनो केंद्र सरकारच्या या 4 योजनांचा घ्या फायदा; मिळेल आर्थिक मदत
बापरे! बैलगाडा शर्यतीतील विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट, कुठे आहे स्पर्धा?