ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ

मुंबई | आजकाल अनेकांची लग्न होताना आपण पाहत आहोत. विशेष म्हणजे या कोरोना काळात बऱ्याच मुला-मुलींचे लग्नाचे बार उडाले आहेत. हल्ली लग्न म्हणजे एक ट्रेंडच झाला आहे. आधीच्या काळी लग्न म्हटलं की नाच-गाणं असायचं. परंतू आता नाच-गाण्यासोबतच आता फोटो आणि व्हिडीओही म्हणायची वेळ आली आहे.

लग्नामध्ये नवरा-नवरीचे खूप सुंदर असे फोटो काढले जातात आणि ते सोशल मीडियावर टाकले जातात. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर तर हल्ली रिल्स बनवण्याची फॅडच सुरू झाली आहे. यामध्ये एखादा विधी करत असताना, नाहीतर नवरा-नवरी एकमेकांमकडे पाहत असताना. त्यांचा व्हिडीओ काढायला आणि त्या व्हिडीओला साजेसं असं बॅकग्राऊंड गाणं लावतात.

तसेच आपल्याला माहित आहे की, काहीजणांना कितीही खाल्लं तरी ते त्यांच्यासाठीच कमीच असते. जिथे जातील तिथे त्यांचं लक्ष केवळ खाण्याच्या पदार्थांकडेच असते. अशा लोकांसाठी आधी त्यांचं खाण असतं आणि त्यानंतर बाकी सगळं. तसेच या भुक्कड लोकांना जर खायला मिळालं नाहीतर, त्यांना काहीच सुचत नाही.

त्याचप्रमाणे लग्नाला ज्यांचं लग्न आहे ते सोडले तर कोणालाही फरसा त्या लग्नामध्ये रस नसतो. म्हणजेच स्वत: नवरा-नवरीच लग्नातला प्रत्येक विधी लक्ष देऊन करत असातात. तर बाकी सगळं वऱ्हाड हे फक्त जेवणावर ताव मारायला आलेलं असतं.

परंतू याआधी तुम्ही कधी असं ऐकलं आहे का, स्वत:च्याच लग्नामध्ये नवरी जेवणावर ताव मारताना. ऐकलं नसेल तर आता हेही तुम्ही पाहू शकाल. सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक नवरी आपलं स्वत:चं लग्न सोडून चक्क बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी पोहचली आहे. हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यामध्ये नवरीने लग्नाचा लेहंगा घातला असून, तिच्या गळ्यात फुलांची माळ असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

या नवरीने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच तिच्या गळ्यामध्ये खूप ज्वेलरीही पाहायला मिळतं आहे. या व्हिडीओतील नवरीकडे पाहून असं वाटतं आहे की, ती सुरू असलेल्या लग्नातून पळून आली आहे. तेही फक्त एक बर्गर खाण्यासाठी. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला अनेकांनी नावं ठेवली आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘विट्टी वेडिंग’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 17 हजार लोकांनी लाईक केलं आहे. तसेच ही व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी यावर मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CNAlR1mjGYM/?utm_source=ig_embed&ig_rid=6dcefdd6-7ce5-4ec6-a4b0-d445b3365475

महत्वाच्या बातम्या-

‘एक बार मेने थोडीसी पिली बेहोश मे हो गई’; म्हणत तरूणीचा डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महिला रिपोर्टरचा ‘हा’ प्रश्न ऐकून जोर-जोरात हसू लागले तालीबानी,पाहा व्हिडीओ

नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

मुलीच्या लग्नात हातात ग्लास घेऊन अनिल कपूरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा