ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने लग्नंच मोडलं; सविस्तर वाचा

मुंबई | लग्न म्हणजेच सर्वांच्याच आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. लग्नामध्ये अनेक नव्या नात्यांची सुरुवात होते. अनेक नवी माणसं जोडली जातात. या दिवशी दोन अनोळखी व्यक्ती थोरा मोठ्यांच्या आशिर्वादाने आणि देवा ब्राह्मनाच्या साक्षीने सात जन्म सोबत राहण्याची शरथ घेतात.

काही वेळेला या आनंदाच्या क्षणी काही विघ्न येतात. यामुळे प्रसंगी लग्न देखील मोडल्याच्या कित्येक घटना आजवर समोर आल्या आहेत. आता अशीच काहीशी आणखी एक हेलावून टाकणारी घटना बुलंदशहरमध्ये घडली आहे.

बुलंदशहर मधील खुर्जा नगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीचं नातेवाईकांच्या संपर्काने एका मुलाबरोबर लग्न ठरलं होतं. ठरल्यानुसार लग्नाच्या दिवशी खुर्जा नगर भागातील मंदिर परिसरात लग्नासाठी सर्व पाहुणे मंडळी जमली. लग्नाचा प्राथमिक विधी मोठ्या आनंदात पार पडला.

यानंतर मुख्य विधीला सुरुवात झाली.  नवरदेवाने नवरिच्या भांगेत कुंकू भरलं. मात्र, नवरदेवाने कुंकू भरताच नवरीने लग्नासाठी नकार दिला. भर मंडपात नवरीने लग्नासाठी नकार दिल्यानं सर्वजण आश्चर्यचकीत झाले. पण नवरीने नकार देण्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आलं आह.

नवरीला लग्नाच्या अगोदर ज्या मुलाचा फोटो दाखवण्यात आला होता, तो मुलगा वेगळा होता आणि प्रत्यक्षात ज्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून दिलं जात होतं, तो वेगळा होता. यामुळे या नवरीने लग्न मंडपात मुलाचा चेहरा पाहताच लग्नासाठी नकार दिला.

मुलीने ऐन मंडपात लग्नासाठी नकार दिल्यानं उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. मात्र, मुलीच्या घरचे तिच्या बाजूने उभे राहिले. यानंतर वधूपक्ष आणि वरपक्षात वाद पेटला. हा वाद एवढा पेटला की याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

काही वेळाने पोलीस देखील लग्न मंडपात हजर झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले आणि नवरीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपली फसवणूक झाल्याने नवरी कोणाचंही ऐकून घेण्यास तयार नव्हती.

नवरीने शेवटपर्यंत या लग्नाला नकार दिला आणि मग वऱ्हाडी नवरीला न घेताच आपल्या घरी परतले. सध्या सर्व परिसरात फक्त या लग्नाचीच चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…