भोंग्याबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य म्हणाले…

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेनं राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ऊडी घेतली आहे.

राणेंचा अधिष बंगला गेल्या काही काळापासून मोठ्या वादाचं कारण ठरला आहे. आपल्या बंगल्यावरील कारवाईची आठवण काढत राणेंनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. राज ठाकरेंनी अधिकृत भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

राज्यात बेकायदेशीर भोंगे का लावावेत, आमचं घर अनधिकृत यांना दिसतं मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही, या शब्दात राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंना आव्हान दिलं आहे.

मुंबई महापालिकेनं आम्हाला पाठवलेली नोटीस ही बेकायदेशीर होती. मुंबईत 90 टक्के बांधकाम हे बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील बेहरामपाडा हा पुर्णपणे बेकायदेशीर आहे मात्र त्यावर हात टाकायची सरकारची हिम्मत नाही, असं राणे म्हणाले आहेत.

मातोश्रीजवळील अनेक बांधकाम ही बेकायदेशीर आहेत, सरकारनं त्यावर कारवाई करावी, असा सल्ला देखील नारायण राणेंनी ठाकरे सरकारला दिला आहे.

राणेंच्या अधिष बंगल्याचा वाद न्यायालयात पोहोचला होता. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारनं राणेंना दिलासा देताना बंगल्यावरील कारवाईला स्थगिती दिली होती.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशीदीवरील सर्वप्रकारच्या  भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र भाजप नेते फक्त अनधिकृत भोंग्याबाबत आपली भूमिका मांडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!