उद्धव ठाकरेंच्या मातोश्री-2ची अशी असेल रचना

मुंबई | ‘मातोश्री’च्या समोरच आता मातोश्री-2 अशी भव्य  इमारत उभी टाकली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही. सध्या ठाकरे कुटुंब मातोश्रीतच वास्तव्याला आहेत. नविन ‘मातोश्री-2’ इमारत ही 8 मजली असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील वांद्रा-कलानगर या महत्त्वाच्या ठिकाणी ही इमारत बांधली आहे. राज्याच्या कारभाराची सुत्रं आता ‘वर्षा’ बंगल्याऐवजी या नव्या मातोश्री-2 या बंगल्यावरुन हालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत वास्तव्याला जाईल असा अंदाज आहे.

मातोश्री-2 ही आठ मजली इमारत 10 हजार स्क्वेअर क्षेञात बांधली असून त्यात तीन ड्युप्लेक्स फ्लॅट, पाच बेडरुम, होम थिएटर, स्टडीरुम, स्विमिंग पूल, हायटेक जीम  अशा सुविधा असण्याची शक्यता आहे. या इमारतीला दोन प्रवेशद्वार असून एक कलानगरच्या बाजूने तर दुसरे बी.के.सी.कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने आहे.

ठाकरे कुटुंब सध्या वास्तवात असलेले मातोश्री ही इमारत बाळासाहेब ठाकरे यांनी 70 च्या दशकात बांधली होती. जवळपास चार दशकं ही इमारत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिली आहे.

महत्वाच्या बातम्या –