कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोल्हापुरमध्ये आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापुरचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या शहरात असताना या यात्रेला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
शहरात काही ठिकाणी यात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती. खुद्द प्रदेशाध्यक्षांच्याच भागात यात्रेला प्रतिसाद नसल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
हॉकी स्टेडियमपासून कळंबाच्या दिशेने ही यात्रा जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी नव्हती. लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता.
कळंबाला झालेल्या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी वगळता शहरात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, नियोजित वेळेपेक्षा लवकर महाजनादेश यात्रा सुरू झाल्याने कार्यकर्ते वेळेत पोहचू शकले नाहीत, असं भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राणा पाटलांचा भाजपप्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झालाय; धनंजय मुंडेंची टीका https://t.co/JlHvd2cxdF @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
अन्यथा मी तुमचं पितळ उघडं पडतो…. ; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज! https://t.co/6guLVXChhi @dhananjay_munde @Dev_Fadnavis #Nanar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
भाजपच्या या आमदारावर खोट्या सह्या दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अडचणीत वाढ https://t.co/dcXRoMmAiC @thobmre @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019