खडसे पहिल्या रांगेत पण तरीही भाषणाचा मान काही मिळाला नाही!

नाशिक | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये हजेरी लावली आहे. मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित आहेत. मात्र पहिल्या रांगेत बसलेले ज्येष्ठ नेते एकनाख खडसे यांना भाषण करण्याची संधी काही मिळाली नाही.

मुख्यमंत्री महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन यांनी यावेळी भाषण केलं. मात्र 2014 ला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे एकनाथ खडसे यांना भाषणापासून वंचित रहावं लागलं.

एकनाथ खडसे यांना भाषण करण्याची संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली.

पंकजा मुंडे, गिरिश महाजन, यांच्यासारख्या खडसेंना ज्युनिअर असलेल्या नेत्यांनी भाषण केली. मात्र खडसे भाषणापासून वंचितच राहिले.

दरम्यान, पंतप्रधानांनी फडणवीसांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळाचं तोंडभरून कौतुक केलं आणि पुन्हा एकदा भाजपचं सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-