मुंबई : इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमधील गरवारे सभागृहात पक्षप्रवेश केला.
सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्त्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू. मी तत्त्वाने वागणारा असून आमच्यासारख्या व्यक्तींसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचं नेतृत्व केलं आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणूकीच्या तारखा होणार ‘या’ दिवशी जाहीर – https://t.co/RUTVeGGsvh #Assembly
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
पुण्यात मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज- https://t.co/KFyYoc57IU #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
लाडक्या बाप्पाला आज निरोप; कडेकोट सुरक्षा तैनात – https://t.co/bzpmSWU6qg #GanpatiBappaMorya
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019