तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती; राष्ट्रवादीची टीका

मुंबई | अर्थमंत्री निर्मला  सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेनुसार सर्वात प्रदीर्घ असं भाषण केलं आहे. त्यांचं भाषण 2 तास 40 मिनिटं चाललं. हे भाषण आणखी काही वेळ चाललं असतं परंतू त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी अर्थसंकल्पातील 2 पानं वाचायची ठेवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या भाषणावर बोचरी टीका केली आहे.

2 तास 41 मिनिटांच्या भाषणात 18,926 शब्दांच्या अर्थहीन अर्थसंकल्पाचा विक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांच्या नावावर जमा झाला आहे. तब्येत बिघडल्याने शेवटची दोन पानं त्यांनी वाचली नाहीत नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धूळफेक झाली असती, अशी बोचरी टीका करणारं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.

दुसरीकडे सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून युवा, शेतकरी आणि सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर नव्या बाटलीत जुनी दारू, असं आजच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण काँग्रेसने केलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी आजचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर दशकातला हा सर्वोत्तम अर्थसंकल्प होता, असं म्हटलं आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ते तिचं शरीर आहे… त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते; ट्रोलर्सना प्रियांकाच्या आईचं प्रत्युत्तर

-……म्हणून सुपर ओव्हरच्या ‘सुपर’ विजयानंतरही भारतीय संघाला मोठा दणका!

-मटन खाल्लं म्हणून हिणवणाऱ्या किरीट सोमय्यांना जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक प्रत्युत्तर!

-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम!

-मोदी सरकारने बजेट मांडल्यानंतर या’ वस्तू होणार स्वस्त…. तर ‘या’ वस्तू महागणार!